Doesn't suit? No problem! You can return items for up to 30 days
You won't go wrong with a gift voucher. The gift recipient can choose anything from our offer.
काळाची गती आणि दिशा एक सारखी आहे. परंतु हा केवळ आपला समज आहे. हा आभास आहे. यात सत्य नाही. वस्तुतः आपला वर्तमान काळ हा भूतकाळातील अनुभवांनी झपाटला गेला. तसेच भविष्यातील कल्पना आणि आकांक्षा नी संमोहित झाला. आपला वर्तमान हा मुक्त नाही. खुला न नाही. प्रत्येक वेळी तो कसल्याश्या प्रभावाखाली काम करतो. त्याची शुध्द हरपली. आणि अशाच प्रभावित आणि शुध्द हरपलेल्या वर्तमान काळास आपण सामोरे जात असल्यामुळे आपण प्रत्येक वेळी प्रतिक्रियात्मक पर्याय निवडले. प्रतिक्रियात्मक निर्णय घेतले. आणि प्रतिगामी काळाची मालिका तयार केली. एका काळाच्या भोवऱ्यात सापडलो जिथे भूतकाळ आणि भविष्यकाळ एकाच विद्यमान बिंदूवर मिळतात.असे हे काळाचे अद्भूत चक्र समजताच आपण त्या काळाच्या भोवऱ्यातून सहज आपली सुटका करून घेवू शकू. आणि मग आपल्याला प्रगतीची नवीन क्षिताजे उघडतील. आपला काळ मुक्त संचार करू लागेल.